You are currently viewing कलमठ येथे महिला मच्छी विक्रेत्याकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

कलमठ येथे महिला मच्छी विक्रेत्याकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

कणकवली

रस्त्यावर बसण्यास अटकाव केल्याच्या रागातून कलमठ येथील मच्छी विक्रेत्या महिलेने ग्रामपंचायत कर्मचारी गौरव तांबे यांना मारहाण केली. ही घटना आज सकाळी सात वाजता कलमठ येथे घडली. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित महीला सपना शिरसाट हिच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मिळताच सरपंच संदीप मेस्त्री, ग्रामविकास अधीकारी प्रवीण कुडतरकर, ग्रा पं सदस्य नितिन पवार, श्रेयस चिंदरकर, ग्रामस्थ स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, सोमनाथ पारकर, वरिष्ठ सहाय्यक दीपक गुरव, खुशाल कोरगावकर, मंगेश कदम, रूपेश कदम, मोहन कदम, प्रतीक उकर्डे आदींनी घटनास्थळी धाव घेत तक्रार देण्यासाठी तांबे यांना पोलीस ठाण्यात नेले. याबाबत अधिक माहित अशी की, कलमठमध्ये सुसज्ज मच्छी मार्केट असतानाही काही मासे विक्रेते पोलीस स्टेशन पासून ते लक्ष्मी चित्रमंदिर पर्यंत रस्त्यालगत बसून मासेविक्री करतात. याचा त्रास वाहनचालकांना होत वाहतूक कोंडी होते. तसेच लगतच्या परिसरात दुर्गंधीही होते. आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कलमठ ग्रा पं चा कंत्राटी कर्मचारी गौरव तांबे यांनी साफसफाई करत असताना मच्छी मार्केट बाहेर बसलेल्या मच्छी विक्रेती महिलेला अटकाव केला. तेव्हा संशयित आरोपी सपना राजू शिरसाट या महिलेने गौरव तांबे यांना शिवीगाळ करून हाताच्या थापटाने मारहाण केली. दरम्यान तांबे यांच्या तक्रारीनुसार संशयित आरोपी सपना राजू शिरसाट विरोधात भादंवि ३२३, ५०४ नुसार उअदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =