You are currently viewing कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड

कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड

कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड

अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री इन ॲक्शन ; अवैध व्यवसायिकांची धाबे दणाणले

कणकवली

कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका बस्तान मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका गोळा करणारे नामांकित मटका बुकी महादेव रमाकांत घेवारी यांच्या कणकवली येथील अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली.

त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना धाड टाकल्याचे कळवले. पोलिसाची कुमक दाखल झाली आहे.११ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.त्यांच्याकडून रोख रक्कम,लॅपटॉप,मटक्याच्या पावत्या जप्त करण्यात येत आहेत.या कारवाई मुळे अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा