उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी व रास्तभाव धान्य दुकानदारांचा गुणगौरव सोहळा
सिंधुदुर्गनगरी
अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच रास्तभाव धान्य दुकानदारांचा गुणगौरव पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
हा समारंभ बुधवार दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अनिल पाटील, कोकण विभगाचे पुरवठा उपायुक्त अनिल टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्या उपस्थित पार पडणार आहे.

