राधाकृष्ण नृत्याविष्कार, सजवलेली दहिहंडी आणि चिमुकल्यांचा आनंदोत्सव ठरला अविस्मरणीय
सावंतवाडी :
गुरुवर्य बीएस नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे येथे शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बालकृष्ण व राधेच्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. आकर्षकरीत्या सजवलेल्या दहिहंडीचे फोडण करून चिमुकल्यांनी आनंदाने उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राधाकृष्ण महती सांगणाऱ्या नृत्याने कार्यक्रमास रंगत आणली.
याप्रसंगी प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ मैथिली मनोज नाईक यांनी उत्सवाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अजय बांदेकर उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. उत्साही वातावरणात साजरा झालेला हा दहिहंडी सोहळा चिमुकल्या बालकृष्ण-राधांच्या गोड वेशभूषेने अधिकच संस्मरणीय ठरला.
