*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी ॲड.संजय माकोणे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माऊली थोडसं थांबायला हवं होतं*
माऊली थोडंसं
थांबायला हवं होत,
समाधी घेण्याचं
टाळायला हवं होत.
पिढीला आमच्या
वाटते एकच खंत,
अर्ध्यातच मावळला
या मातीतला संत.
कोवळ्या वयात केले
तुम्ही डोंगराएवढ काम,
त्यानेच तर टिकला
आमच्या मनातला राम.
एवढ्याशा वयात
उभारली ज्ञानाची गुढी,
भल्या-भल्यांनाही
उमगत नाही शब्दांची कोढी.
तुम्ही हवे होता
अजून थोडे दिवस,
माय मराठीला सावरायला
डंका तिचा मिरवायला.
खंत वाटते मनाला
माऊली थांबले असता अजून,
अज्ञानाचा राक्षस
काढला असता भाजून.
मुक्ताईची हाक एकदा
ऐकली असती आतून,
ज्ञानाचा अथांग सागर
गेला असता रीतून.
सच्चीदानंदांच्या हातात
लेखणी एकदा टाकून,
माऊली पुन्हा एकदा
बसायला हेवे होत,तुम्ही पैस खांबाला टेकून………..
✍️ ॲड.संजय माकोणे अमळनेरकर