You are currently viewing रत्नागिरी जि. प. अध्यक्षपद निवडीचा पेच अखेर सुटला

रत्नागिरी जि. प. अध्यक्षपद निवडीचा पेच अखेर सुटला

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पदाच्या निवडीचा पेच अखेर सुटला असला तरी ज्येष्ठ सदस्य उदय बने यांची समजूत काढताना पदाधिकारी निवडीत मोठे फेरबदल करण्यात आले. उपाध्यक्षपद उदय बने यांच्याकडे बांधकाम आणि आरोग्य समितीचा पदभार देण्यात आला आहे. प्रथमच उपाध्यक्ष यांच्याकडील कृषी खाते काढून दुसरे खाते देण्यात आले आहे.

दरम्यान जि. प. अध्यक्ष पदासाठी आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. तर अध्यक्षपदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार उदय बने यांना उपाध्यक्ष पद देण्याचा निर्णय शिवसेना नेत्यांनी घेतला आहे. उपाध्यक्ष पदासह त्यांना बांधकाम आणि आरोग्य समिती हे महत्त्वाचं खातं देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा