You are currently viewing कृष्णावतार

कृष्णावतार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*” कृष्णावतार “*

 

हा मोहन मुरलीवाला

कारागृहात अवतरला

आनंद विभोर असा तो

घन काळा बरसत गेला ||

 

यमुना दुथडी ही नाचे

आनंदा उधाण आले

सांगावा गरजत जाई

सुख सोनपावली आले ||

 

रोमांचित नंद यशोदा

परब्रह्मच पदरी आले

आनंदोत्सव भूवर हा

भाग्याचे द्वार उघडले ||

 

कापरे भरे दुष्टांना

सज्जनास अभय मिळाले

भूमंडळ प्रसन्न झाले

मंदिरात उत्सव चाले ||

 

विनवणी ऐकली त्याने

रक्षणार्थ धावत आला

स्थापण्या पुन्हा धर्माला

कृष्णावतार हा झाला ||

 

श्रीकृष्ण नाव प्रेमाचे

श्रीकृष्ण नाव सत्याचे

श्रीकृष्ण नाव कर्माचे

श्रीकृष्ण नाव धर्माचे ||

 

*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा