You are currently viewing युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस

युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस

*विशाल फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम..*

 

*दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन*

 

*विशाल परब, संजू परब हे निलेश राणे यांचे जवळचे मित्र*

 

*सावंतवाडीचा नगराध्यक्ष हाच विधानसभेचा आमदार – दत्ता सामंत*

 

 

सावंतवाडी:

युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, विशाल फाउंडेशन माध्यमातुन सिंधुदुर्गात विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आल्याची माहिती भाजपचे दत्ता सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सावंतवाडीतील शिल्पग्राम येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी रणजित देसाई, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, बाळा मोर्ये, दादा साइल, बाळू देसाई, आदी उपस्थित होते.

दत्ता सामंत म्हणाले, विशाल परब हे विशाल फाउंडेशन माध्यमातुन सिंधुदुर्गात सामजिक जाणिवेतून काम करतात. दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम ते आयोजीत करीत असतात.

त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा व्हावा, अशी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा आहे.

माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे वाढदिवस सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.

प्रश्नोत्तरा दाखल दत्ता सामंत म्हणाले, संजू परब आणि विशाल परब हे निलेश राणे यांचे जवळचे मित्र आहेत, सावंतवाडीचा नगराधक्ष हा आमदार होतो, त्यामूळे संजू परब हे निश्चितच आमदार होतील असा विश्वास दत्ता सामंत यांनी वेक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा