मुंबई : टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या दातृत्वासाठीच त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच भारतरत्न देण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. तसेच सोशल मीडियावर त्यांना भारतरत्न देण्याची मागणी ट्रेंडिंगवर आहे. याच मागणीवर आता खुद्द रतन टाटा यांनी पूर्णविराम लगावला आहे. सोशल मीडियावरील मागणीनंतर रतन टाटा यांनी ट्वीट करून मला भारतरत्न देण्याची मोहिम थांबवा अशी विनंती केली आहे.
त्यामुळेच सोशल मीडियावर काल रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती. #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग देखील काल ट्रेंड सुरू झाला होता. मात्र आता सोशल मीडियावरील मागणीनंतर रतन टाटा यांनी ट्वीट करून मला भारतरत्न देण्याची मोहिम थांबवा अशी विनंती केली आहे.
मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यासाठी बिंद्रा यांनी ट्विटरवर #BharatRatnaForRatanTata ही मोहिम सुरू केली. या मोहिमेत लोकांना सहभागी होण्याचे आवाहन देखील केले. या नंतर रतन टाटा यांनी सकाळी ट्वीट केले आणि म्हणाले, ‘मला भारतरत्न मिळावा यासाठी सोशल मीडियावर तुम्ही दाखवलेल्या भावनांचा मी आदर करतो. परंतु माझी एक विनंती आहे की, ही मोहिम थांबवावी. मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगतीसाठी मी माझे योगदान कायम देत राहील’