You are currently viewing ते गंध रांगडे

ते गंध रांगडे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ते गंध रांगडे*

 

धुक्यात गेल्या अबोलवाटा ओलावुनि त्या स्मृती

स्पर्शात गंध जाणवे किती..

 

चंद्र नभीचा कधी खुणावे चमचमत्या चांदण्या

आरक्त शृंगारा सजविण्या…

 

सळसळ पानी शीळ वाऱ्यात थेंबात गळे कशी

ओल्यात होते वेडीपिशी..

 

का दुराव्यात क्षण हे वेचू माझे मला नकळे

संपले वाटता परत गळे..

 

ते क्षितिज उगा भासे उदास रंगात सोनसळी

मावळे गालावरची खळी…

 

वचनांना त्या वेढतो तमस मिटोनि त्या भावना

हुरहुरत झाकोळी कामना ..(का मना)

 

तू नसल्याचे दुःख मोडके उरावरी पेलते

 

खोटेच फूल दगडी खुलते..

 

त्या पुष्पांना नसतो सुगंध गडद रंग बेगडे

 

फांदीत झुले फक्त रांगडे

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा