You are currently viewing आंबोली सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश..

आंबोली सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश..

सावंतवाडी :

 

बांदा येथे झालेल्या हॅण्डबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या संघांनी १४ वर्षे वयोगटात प्रथम, १७ वर्षे वयोगटात प्रथम तर १९ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक मिळविला.

शालेय कॅरम स्पर्धेत सैनिक स्कूलच्या शार्दुल देव या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळविला. त्याची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या दोन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. १४ वर्षे वयोगटात कॅडेट ओम निकम याने तृतीय क्रमांक मिळविला. १७ वर्षे वयोगटात कॅडेट कनाद कुलकर्णी याचा चतुर्थ कमांक आला. या दोन्ही खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ओरोस येथे झालेल्या शालेय मैदानी स्पर्धेत १७ वयोगटात स्कूलचा खेळाडू अवधूत पाटील याने १०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. १५०० मीटर धावणे स्पर्धेत लाडोजी सावंत याने प्रथम क्रमांक मिळविला. ४×१०० रिले व ४x४०० रिले स्पर्धेत अवधूत पाटील, स्वयंम पाटील, गौरव प्रसाद, हर्ष देसाई, लाडोजी सावंत, प्रणव मोरे, स्वयं पाटील, शिवराज पाटील, श्रेयस शिर्के यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तिहेरी उडीमध्ये स्वयं पाटील याने प्रथम क्रमांक मिळविला.

यशस्वी स्पर्धक, क्रीडा प्रशिक्षकांचे संस्थेचे उपाध्यक्ष दीनानाथ सावंत, सचिव सुनील राऊळ तसेच संचालक जॉय डॉन्टस, शंकर गावडे, शिवाजी परब व सर्व संचालक, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, सैनिक स्कूलचे प्राचार्य नितीन गावडे यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा