You are currently viewing सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटनेच्या संपात बहुसंख्य कार्यालयीन कर्मचारी सहभागी…

सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटनेच्या संपात बहुसंख्य कार्यालयीन कर्मचारी सहभागी…

सिंधुदुर्गनगरी:
विविध प्रश्नांसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीने पुकारलेल्या संपाला सकाळ पासूनच सुरुवात झाली आहे. या एक दिवशीय संपात बहुसंख्य कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपाला मोठा प्रतिसाद लाभला असून शासकीय कार्यालये कर्मचारी अभावी रिकामी दिसत आहेत.
कर्मचारी समन्वय समितीने संप पुकारल्यावर भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येतो. परंतु सद्या कोरोना संक्रमण कालावधी असल्याने मोर्चा टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. याऐवजी समन्वय समिती व घटक संघटनांचे जिल्हा पदाधिकारी गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना देण्यासाठीचे निवेदन सादर करतील. तर प्रत्येक तालुक्यात घटक संघटनांचे तालुका पदाधिकारी तहसीलदार यांना निवेदन सादर करतील असे कळविण्यात आले आहे. संपात समन्वय समितीच्या सर्व घटक संघटना उतरल्या असल्याने व संप यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली होती. त्यानुसार सकाळ पासून सर्व कर्मचारी एक दिवशीय संपात सहभागी झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + fourteen =