You are currently viewing भुताखेतांच्या गोष्टी

भुताखेतांच्या गोष्टी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे चे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

 

*भुताखेतांच्या गोष्टी*

( क्रमांक १३ वा )

 

माझे विद्यमान मित्र अशोकराव आवारे सरांनी श्रद्धा आणी अंधश्रद्धा याबद्दल सुंदर विवेचन केले आहे ..याबद्दल दुमत नाही ..

ती चर्च्या इथे नाही ..

सत्य हे कधीच कल्पक नसते ! ती वास्तवता असते ..! त्या वास्तवी अनुभूतीवर विश्वास असणे म्हणजे श्रद्धा व वास्तवी अनुभूती नसताना एक कल्पित सत्य मानणे म्हणजे अंधश्रद्धा असे म्हणावे !…..जे दिसते ,जे स्पर्शते, जे जाणवते ते शाश्वत सत्य असते . जे दिसत नाही , ज्याचा गंधवास येत नाही , स्पर्श होत नाही , ज्याची अस्तित्व जाणीव होत नाही . ज्याची सत्यता जाणवत नाही ते असत्य ..! एवढांच सत्य अन असत्याचा अर्थबोध ..! असे मला वाटते ….आणी या साऱ्या गोष्टी फक्त विवेकी वैचारिकतेवर , तौलनिक ठरतात … त्यात मतांतरे असू शकतात …!

सृष्टित या शाक्त विद्या , कर्णपिशाच्य विद्या , मंत्रतंत्रशास्त्र विद्या , भानामती विद्या , जादूटोणा या खऱ्या आहेत काय ? हाच मूलभूत प्रश्न समाजात आहे …नवीन पीढ़ीला तर याची काही माहिती नाही , कारण हा काळ प्रगत वैज्ञानीक आहे , जग खुप बदललेले आहे ..पण या विद्या अस्तित्वात आहेत असे जुन्या पिढितील लोकांचे मत आहे ..आणी त्यात सत्यांश आहे ..कारण त्यांना स्वानुभूती आहे ..अनेक सत्य घटना आहेत की ज्या प्रत्यक्षात घडल्या आहेत …ईश्वर ही एक अनामिक शक्ती आहे ..सर्वारथाने होणारे सृष्टितील निसर्गाचे कालचक्र , निसर्ग परिवर्तन ( त्यामध्ये सर्व सजीवसृष्टी देखील आहे ) युगानुयुगे जे सुरु आहे आणी त्याचे अविरत नियंत्रण करणारी जी अद्भुत ,अविनाशी प्रबळ अनभिज्ञ शक्ती आहे त्याच शक्तीला आपण ईश्वर ,भगवंत , अल्ल्ला , येशु इत्यादी संबोधतो ..हे महत्वाचे आहे ….!

ईश्वरा बद्दलची श्रद्धा आणी अंधश्रद्धा ही स्वानुभूती वर आणी जाणीवेवर अवलंबून आहे ..! असे मला वाटते .

जगातील अनेक धर्मग्रन्थामधुन पोथीपुराणातून ऋषीमुनींनी , तत्ववेत्यांनी , साधु संतांनी ईश्वरीय अस्तित्वा बद्दल तसेच सृष्टिबद्दल आपली वैयक्तिक मते , स्वानुभव व्यक्त केले आहेत ..त्यात तथ्य असावे असे वाटते ..

प्रामुख्याने दत्त संप्रदाय , नाथ संप्रदायात शाक्तविद्या , भुतपिशाच्य योनी अशा गोष्टि बद्दल उहापोह आढळतो ..अनेक घड़लेल्या गोष्टिबद्दलचा खुलासा दिसून येतो …!

सृष्टित मनुष्य योनी जशी आहे तसा पिशाच्च्य योनी तसेच अदृश्य शक्ती अनेक आहेत . ज्याला ज्याचा अनुभव येतो तो त्याचेच अनुभव कथन करतो …

असाच एक सत्य अनुभव माझ्या ऐन उमेदीतील ( तरुणपणातील ) आज सांगतो आहे . साधारणत: ५० वर्षापूर्वीचा …..!

कृष्णा नदीच्या काठावर *कृष्णामाई* चा उत्सव साजरा करण्याची पारंपरिक प्रथा आजही आहे ..कृष्णाकाठी म्हणजे सातारा जिल्ह्यात वाई , भुईंज , लिंब , सातारा , कराड , सांगली अशा अनेक ठिकाणी हा उत्सव एप्रिल मध्ये वैशाख शुद्ध एकादशी ते पौर्णिमे पर्यंत ५ दिवस सुरु असतो ..मी या सर्व ठिकाणी गेलो आहे ..एकदा लिंब या गावी गेलो होतो तो प्रसंग ..!

साताऱ्यापासून मुंबई बगेंलोर हायवेवर १२ मैलावर आहे ..मी व माझा मित्र वासुदेव किरवे आमचे जायचे ठरले ..सायकली भाडयाने घेतल्या , घरातून रात्री ८ वाजता निघालो ..पेठेतच एक सिनेमा थिएटर होते .तिथे गल्लीतील मित्र भेटले . नेमका थेटरला *गंगाजमना* सिनेमा लागला होता . गल्लीतच थिएटर असल्यामुळे आम्हाला मुक्त प्रवेश नेहमीच असे. त्यामुळे मित्रासोबत आम्ही सिनेमा पाहिला रात्रीचे १२ वाजुन गेले होते ..

मित्र म्हणाले अरे सकाळी जा .खुप रात्र झाली आहे .. पण रात्रीच नदीत मंडप उभरतात सर्व पुरुष गावकरी जमलेले असतात ..

घाटावर पूर्ण लाईटिंग केलेले असते त्याच प्रकाश झोतात आम्ही मंडप उभारतो ..आधीच खुप उशीर झाला आहे . आम्ही अर्धा तासात पोहचू देखील अशी चर्च्या करून आम्ही दोघांनी सायकली वर टांग मारली देखील आणी निघालो . गावाची वेस ओलांडली , मोळाचा ओढा सुद्धा ओलांडला आणी हायवे रोडला लागलो देखील .वाढे रोडला लागल्या वर आम्हाला एक छोटा मालट्रक (खेकड़ा मॉडेल) फूललोड (गच्च भरलेला) आमच्या पुढे घों ,घों चालला होता . नेहमीच्या सवयी प्रमाणे त्याच्याच मागील लाकडी फ़ाळकयाच्या दोनही बाजुच्या साखळ्याना धरुन पैडल न मारता आम्ही अगदी आरामात लिंब खिंड गाठली . त्यामुळे देखील सायकल चालवयाचाही त्रास खुप वाचला होता . आता लिंब तसे जवळच आले होते ..खिंडीतून उतार लागला तसा आम्हा दोघांच्या सायकली जोरात वेगात चालू लागल्या पण अचानक आम्हा दोघांच्या बरोबर एक मध्यमवयीन माणुस आम्हा दोघांच्या समांतर सायकल सोबत सायकलच्या वेगाने पळत होता ..रस्त्यावर शुभ्र चांदणे होते .ती व्यक्ती आम्हाला दिसत होती , आणी पळता पळता ओरडत होती ..” आरं ! आरं ! पोरांनो मला घेवून चला रं …! आरं मला घेवून चला रं ….! ” जरा थोडं थांबा ..आरं थांबा ..!!!एवढया अपरात्री हा माणुस सायकलच्या वेगात पळतो हेच विचित्र होते ..आम्हाला या गोष्टीची कल्पना आली ..(कारण अशा गोष्टी मी लहानपणा पासून ऐकत होतो ) मी वासुला म्हणालो ” वाश्या सायकल अजुन जोरात पळीव …हे जरा वेगळेच आहे ..आम्ही दोघांनिही जीव खावून सायकल दामटली तरी तो माणुस आमच्या वेगाने पळत होता . आम्ही सुद्धा खुप घाबरलो होतो ..आम्ही नागेवाडीची वेस ओलांडली होती .तेंव्हा तो माणुस त्या वेशी वर थांबला आणी म्हणाला ” सुटला रं ! सुटला रं ! पोरांनो तुम्ही ….!!

हा आवाज ऐकला आणी आम्ही मागे पाहीलं तर तो मागे लागलेला माणुस दिसला नाही .

दहा मिनिटात लिंब गावात पोहोचलो देखील . घड़लेला सर्व प्रकार कृष्णामाईच्या घाटावर जमलेल्या सर्वांना सांगितला ..तेंव्हा तिथे काही बुजुर्ग माणसे होती त्यांनी या घटनेला दुजारा दिला , आणी लिंब खिंड ते नागेवाडी तसेच पाचवड ते भुईंज या परिसरात असे अनुभव येतात …असे सांगीतले …हा माझा अनुभवलेला स्वानुभव …हेच अनुभव मला पुणे सातारा रात्री प्रवास करताना बरेच वेळ आले आहेत ..ते पुढच्या भागात …..नमस्कार .

➖➖➖➖➖➖➖➖

*©विगसा*

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा