You are currently viewing भंडारी समाजाचा इतिहास मोठा असुन मायनाक भंडारी यांचा इतिहास नव्या पिढीला कळला पाहिजे,,,,,, ना नितेश राणे!

भंडारी समाजाचा इतिहास मोठा असुन मायनाक भंडारी यांचा इतिहास नव्या पिढीला कळला पाहिजे,,,,,, ना नितेश राणे!

भंडारी समाजाचा इतिहास मोठा असुन मायनाक भंडारी यांचा इतिहास नव्या पिढीला कळला पाहिजे,,,,,, ना नितेश राणे!

अतुल बंगे यांचा भंडारी समाजासाठी असलेला पाठपुरावा राजकारणापलीकडचा—ना नितेश राणे!

ओरोस (प्रतिनिधी)

मायनाक भंडारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत अनेक किल्ले काबिज करण्यात हातभार होता ते पहीले आरमार प्रमुख अपराजित योध्दा असल्याने आज नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी हे नामकरण करत असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेश राणे यांनी केले
जिल्हाधिकारी कार्यालयातील अद्यावत बनवलेल्या नियोजन सभागृहाला अपराजित योध्दा मायनाक भंडारी सभागृह असे नामकरण करण्यात आले यावेळी ना नितेश राणे बोलत होते
ना राणे आणि आमदार दीपकभाई केसरकर यांच्या शुभहस्ते या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ना राणे बोलताना पुढे म्हणाले भंडारी समाज या जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत अपराजित योध्दा मायनाक भंडारी यांनी आरमार प्रमुख पदाची जबाबदारी घेऊन अनेक किल्ले काबिज केले आजही इतिहास त्यांचा बोलता चालता आहे म्हणुनच भंडारी समाजाचे आमचे मित्र अतुल बंगे यांनी माझ्या कडे दोन मागण्या केल्या आहेत त्यातील मायनाक भंडारी यांचे नामकरण आणि दुसरे कुडाळ येथे भंडारी भवन या दोन मागण्या पैकी एक मागणी आज पुर्ण केली आणि जिल्हा भंडारी भवनाचे भुमी पुजन याच गणेत्शोव काळात करुन दीलेला शब्द पुर्ण करु असे सांगुन श्री बंगे हे भंडारी समाजासाठी जेजे मागतील ते ते देण्यासाठी मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन कटीबध्द आहे असेही ना राणे यांनी सांगितले
यावेळी आमदार दीपकभाई केसरकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले भंडारी समाजाचा इतिहास फार मोठा आहे मुंबई वसली ती थोर समाज सेवक व दानशुर व्यक्ती कै भागोजीशेठ किर यांच्या मुळे म्हणून आपणही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाजाच्या कामासाठी सदैव तत्पर आहोत भंडारी भवन व्हावे पण मच्छिंद्र कांबळी वसतीगृह सुध्दा याच ठिकाणी व्हावे अशी अपेक्षाही श्री केसरकर यांनी व्यक्त केली
कार्यक्रमाचे मनोगत भंडारी समाजाचे नेते अतुल बंगे यांनी व्यक्त करताना सांगितले जे मागतो ते देण्याचा प्रयत्न प्रामाणिक पणे पालकमंत्री ना नितेश राणे करत आहे आमच्या समाजासाठी चांगल्या कामासाठी रात्री मला फोन करणारे पहीले पालकमंत्री आपण बघितले आणि कसलही राजकारण मनात न ठेवता स्वच्छ मनाने काम करतात हेच आमच्या समाजासाठी प्रेरणादायी आहे असे श्री बंगे यांनी सांगितले
यावेळी व्यासपीठावर ना नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक डॉ दहीकर, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर, उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनिश दळवी, भंडारी समाजाचे नेते अतुल बंगे, जिल्हा भंडारी समाज जिल्हा अध्यक्ष हेमंत करंगुटकर, कार्याध्यक्ष राजु गवंडे, सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष श्री प्रसाद आंरवदेकर, मालवण तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष श्री रवी तळाशीलकर, मायनाक भंडारी यांचे वंशज रत्नागिरी प्रशांत मायनाक, मालवण वायरी व मालवण आंबेरी येथील मायनाक वंशज, दर्शन कुडव, राजन कोरगावकर, जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर,, शरद पावसकर, भरत आवळे,पपु चिपकर, श्री आरोलकर, प्रमोद चिंदरकर, रूपेश पावसकर, सरमळकर उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा