दुर्गम भागातून प्रवास करणारी साक्षी शालांत परीक्षेत तालुक्यात दुसरी

दुर्गम भागातून प्रवास करणारी साक्षी शालांत परीक्षेत तालुक्यात दुसरी

दुर्गम भागातून प्रवास करणारी साक्षी शालांत परीक्षेत तालुक्यात दुसरी

दोडामार्ग / सुमित दळवी :-

सदगुरू वामनराव पै म्हणायचे,”प्रयत्न हे देवापेक्षाही श्रेष्ठ असतात.”आणि याचा प्रत्यय मार्च शालांत परीक्षेत दोडामार्ग तालुक्यात आला… मांगेली सारख्या दुर्गम भागातून प्रवास करत, करूणा सदन स्कूलची विद्मार्थीनी कु. साक्षी विजय गवस हिने शालांत परीक्षेत ९६.४०% गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. म्हणून मांगेली ग्रामपंचायत व मांगेली दक्षता समिती यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच सूर्यनारायण गवस, उपसरपंच विश्वनाथ गवस, सदस्य विनिता गवस, विजय गवस, पोलिस पाटील विलास शेटकर, जिल्हा प्रा.शिक्षक पतपेढी अध्यक्ष शिक्षक विठ्ठल गवस तसेच नारायण गवस, ज्ञानेश्वर गवस आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक विठ्ठल गवस यांनी दळणवळ, विद्मुत, मार्गदर्शन वर्ग यासारख्या गंभीर समस्या आजही या भागात आहेत.

आजही इथल्या मुलांना घरकामात, शेतीकामात आई-वडीलांना मदत करावी लागते या समस्यांवर मात करत साक्षीने मिळवलेले यश हे निश्चितच इतरांना प्रेरणादायी आहे, असे उद्गार काढले.
यावेळी आरोग्य कर्मचारी व शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा