आरवली / वेंगुर्ला :
श्रावण महिन्याच्या पवित्र सोमवारच्या निमित्ताने गोव्यातील एका भक्ताने श्री देव वेतोबाच्या चरणी भक्तिभावाने जाईच्या फुलांचा अंगरखा अर्पण केला. देवस्थानात हे खास सजलेले रूप पाहण्यासाठी भक्तांची गर्दी उसळली होती.
“नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा” अशी ख्याती असलेल्या श्री देव वेतोबाचे हे अनुपम दर्शन पाहण्यासाठी परिसरातील तसेच दूरदूरच्या श्रद्धाळूंची उपस्थिती लाभली. जाईच्या फुलांनी बनवलेला अंगरखा देवाच्या गाभाऱ्यात एक खास प्रसन्न वातावरण निर्माण करणारा ठरला.
श्रावणातील प्रत्येक सोमवार भक्तांसाठी विशेष असतो. या निमित्ताने वेतोबा देवस्थानात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजाअर्चा आयोजित करण्यात आली होती. जाईच्या फुलांचा सुगंध, भक्तांचा भाव आणि देवतेचं तेजस्वी रूप यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

