You are currently viewing मनोमिलनाचे मानकरी..शब्द माझे

मनोमिलनाचे मानकरी..शब्द माझे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मनोमिलनाचे मानकरी..शब्द माझे*

 

ओठावरील गाणं सांगा

शब्दांचं …भविष्य सांगतो

फसव्या संशय कल्लोळात

ज्योतिषाची खिल्ली उडवतो

 

शब्दांनाही ग्लानी येईल

रसाळ शब्दांना..तर्काची धार

मशागत..माझ्या शब्दांची

लेखणीला हवी..शस्त्रे धारदार..

 

कडवट शब्दांची लिटमसटेस्ट

छुपा अजेंडा..गाठणार

डाळ शिजली नाहीतर

मनोमिलनाची आस धरणार..

 

आपमतलबी उमाळे शब्दांचे

मनोमिलनाचे मानकरी होणार

शब्दांची …ओटी भरायला

कुणी सुहासिनी..नाही उरणार ..

 

मनोमिलनाचे शहाणपण अनाठायी

अमूल्य वेळेची…नासाडी

शब्दांची पाळेमुळे खणून

उघडली मनोमिलनाची आघाडी..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा