You are currently viewing १२ ऑगस्ट रोजी उबाठा पक्षाच्या वैभववाडी तालुका शाखेचा शुभारंभ

१२ ऑगस्ट रोजी उबाठा पक्षाच्या वैभववाडी तालुका शाखेचा शुभारंभ

वैभववाडी :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभववाडी तालुका शाखेचा शुभारंभ मंगळवार दि.१२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता संपन्न होणार आहे.

या शुभप्रसंगी माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते बाळ माने, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, माजी आमदार जीजी उपरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आदी शिवसेना पदाधिकारी माव्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

तरी वैभववाडी तालुक्यातील सर्व शिवसेना-युवासेना पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके व युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा