You are currently viewing धर्मवीर शंभूराजे यांच्या जीवनपटाचा अभ्यासक्रमात समावेश करणेबाबत बालभारतीस निवेदन…

धर्मवीर शंभूराजे यांच्या जीवनपटाचा अभ्यासक्रमात समावेश करणेबाबत बालभारतीस निवेदन…

 दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानमास निमित्ताने शिवप्रेमी सिंधुदुर्ग ग्रुप च्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित पाठचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा यासाठी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या अंतर्गत शिवप्रेमी संघटनांकडून या मागणीची पत्रे जिल्हाधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांना देण्याचे कार्य सुरू करण्यात आलेले आहे.
त्यांच्या या कार्यात दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग सहभागी झालेला असून हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी अर्थात धर्मवीर छत्रपती संभाजी राजे भोसले यांचा अजिंक्य झंझावात, अतुलनीय शौर्य व पराक्रम शालेय वयातील विद्यार्थांच्या बाल मनावर संस्कारीत व्हावा व स्वाभिमानी, सामर्थ्यवान, बलशाली, कुशाग्र, अष्टावधानी पिढी छत्रपती शंभूराजेंसम घडावी यासाठी शालेय अभ्यासक्रमात इयत्ता ४ थी , इयत्ता ७ वी व इयत्ता ९ वी मधील इतिहास विषयात छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनपटावर आधारीत पाठ समाविष्ट करावा आणि स्वराज्य रक्षक संभाजीराजेंचा इतिहास वर्गा वर्गात शिकवून नविन पिढीसमोर एक अष्टावधानी चारित्र्यसंपन्न आदर्श ठेवावा या विनंतीची आज दिनांक २२ मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी तसेच संचालक बालभारती यांना निवेदने देण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी संघटनांना वरील मागणीची जास्तीत जास्त निवेदने मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी तसेच dir.balbharati@mahedu.gov.in या मेल आयडीवर बालभारतीच्या संचालकांना वरील मागणीचा मेल करावा असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग चे अध्यक्ष श्री गणेश नाईक यांच्याकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + thirteen =