सुकळवाड :
श्रावणीमेळा कार्यक्रमांतर्गत श्री देव ब्राह्मण सेवा समिती सुकळवाडच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा सोमवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा तीन गटामध्ये होणार आहे. यामध्ये पहिला गट १ ली ते ४ थी, दुसरा गट ५ वी ते ७ वी, तिसरा गट ८ वी ते १० वी या तीन गटामध्ये होणार आहे. प्रत्येक गटासाठी प्रथम पाच पारितोषिके पुढीलप्रमाणे १००० रु. व चषक, ७५० रु. व चषक, ५०० रु. व चषक, ३०० रु. व चषक, २०० रु. व चषक व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सुयोग धामापूरकर ९४०४३९६२१६, श्रीकृष्ण आडेलकर यांच्याशी संपर्क साधावा. सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव ब्राह्मण सेवा समिती सुकळवाडच्यावतीने करण्यात आले आहे.

