You are currently viewing दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा प्रखर निदर्शने करण्यात येतील – बाबुराव धुरी

दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा प्रखर निदर्शने करण्यात येतील – बाबुराव धुरी

दोडामार्ग
पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्या या मागणीसाठी दोडामार्ग तहसिलदार यांना शिवसेना दोडामार्गच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्रसरकारच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. पेट्रोल डिझेल दरवाढ, शेतकऱयांच्या प्रश्नावर राज्यात निदर्शने होत असताना दोडामार्गातही निदर्शने करण्यात आली. पेट्रोल डिझेल दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा यापेक्षा प्रखर निदर्शने करण्यात येतील असा इशारा बाबुराव धुरी तालुकाप्रमुख दोडामार्ग यांनी दिला, अच्छेदिन भुलभुलैया असल्याचे सांगत सामान्यांचे कंबरडे मोडल्याचे ते म्हणाले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख गणेश प्रसाद गवस, उप सभापती धनश्री गवस, उपजिल्हासंघटक गोपाळ गवस, युवासेना समन्वयक मदन राणे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी, महिला आघाडी प्रमुख श्रेयाली गवस, उपविभागप्रमुख मिलिंद नाईक, गुरुदास गवस, दादा देसाई, सज्जन धाऊसकर, आत्माराम मेस्त्री, रामदास मेस्त्री, सुरेखा लोंढे, भिवा गवस, प्रसाद कुडास्कर, आनंद धाऊसकर, महादेव कासार, विवेक एकावडे आदी होते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + twelve =