कोकण रेल्वेकडून रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन विशेष गाड्या
सावंतवाडी
रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दोन विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक मोठी सोय ठरणार असून, यामुळे सुट्ट्यांमध्ये प्रवास करणे अधिक सोपे होईल.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक (टर्मिनस) ते मडगाव जंक्शन दरम्यान दोन विशेष गाड्यांच्या एकूण चार फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक आणि रचना खालीलप्रमाणे आहे:
गाडी क्र. 01125 / 01126 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Special
* गाडी क्र. 01125 लोकमान्य टिळक (ट) येथून 14 ऑगस्ट 2025 (गुरुवार) रोजी रात्री 22:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:45 वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
* परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. 01126 मडगाव जंक्शनवरून 15 ऑगस्ट 2025 (शुक्रवार) रोजी दुपारी 13:40 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:05 वाजता लोकमान्य टिळक (ट) येथे पोहोचेल.
या गाडीमध्ये एकूण 22 LHB डबे असतील, ज्यात प्रथम AC, 2 टायर AC, 3 टायर AC आणि स्लीपर क्लासचा समावेश आहे.
गाडी क्र. 01127 / 01128 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanaya Tilak (T) Special
* गाडी क्र. 01127 लोकमान्य टिळक (ट) येथून 16 ऑगस्ट 2025 (शनिवार) रोजी रात्री 22:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:45 वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
* परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. 01128 मडगाव जंक्शनवरून 17 ऑगस्ट 2025 (रविवार) रोजी दुपारी 13:40 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:05 वाजता लोकमान्य टिळक (ट) येथे पोहोचेल.
या गाडीमध्ये देखील एकूण 22 LHB डबे असतील, ज्यात 2 टायर AC, 3 टायर AC, स्लीपर आणि जनरल डब्यांचा समावेश आहे.
थांब्यांची माहिती:
या दोन्ही विशेष गाड्या ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी या प्रमुख स्थानकांवर थांबतील.
आरक्षणाची सुविधा:
या विशेष गाड्यांपैकी गाडी क्र. 01126 आणि 01128 साठी तिकिटांचे आरक्षण 09 ऑगस्ट 2025 पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), तसेच इंटरनेट आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.
प्रवाशांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. सुनील बी. नारकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
