You are currently viewing विशेष मोहिमेंतर्गत 99 केसेसमध्ये 104 आरोपीविरुद्ध कारवाई – पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल

विशेष मोहिमेंतर्गत 99 केसेसमध्ये 104 आरोपीविरुद्ध कारवाई – पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल

सिंधुदुर्ग :

 

अवैध दारु विक्री व वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष मोहिमेंतर्गत 99 केसेस मध्ये 104 आरोपीविरुद्ध कारवाई केलेली आहे. यामध्ये 1 कोटी 15 लाख 47 हजार 436 किंमतीचा मुद्देमाल त्यात सुमारे 5 हजार 993 मि.लिटर दारु व 11 वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच वारंवार दारु विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 93 नुसार 20 इसमांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.

जिल्ह्यात दारू विक्री व वाहतूकीबाबत कारवाई करण्यात आलेली असून भविष्यातही जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही व अशा प्रकारची कारवाई निरंतर सुरू राहणार आहे. याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना आदेशीत करण्यात आलेले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रक्रीया तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर परिणामकारक कारवाई व्हावी याकरीता जिल्ह्यात अवैध दारु विक्री व वाहतुकीवर निर्बंध आणुन, केसेस करण्यासाठी दिनांक 21 एप्रिल ते 12 मे 2023 या कालावधीत जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुक करणाऱ्यांविरुध्द विशेष मोहीम राबविण्याबाबत सर्व प्रभारी अधिकारी, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस आदेश दिलेले होते. त्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, असल्याचेही पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + four =