You are currently viewing तू खिडकीत बसून बाई….

तू खिडकीत बसून बाई….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तू खिडकीत बसून बाई….*

 

तू खिडकीत बसून बाई हसू नको नि

माझ्यावर कध्धी तू रूसू नको…

 

तुला बघूनच मी खुश होतो

वाऱ्यावर जणू मी पोहतो

स्वप्न पाहतो रोजच गोड

तुला पटवणं फारच अवघड

पाठ माझ्याकडे कधीच फिरवू नको नि

माझ्यावर कध्धी तू…

 

कशी देऊ मी प्रेमाची ग्वाही

तुला दाखवू का माझी वही

तुझ्या नावाचा जप मी लिहीला

त्यात गुलाब सुद्धा वाहिला

गुलाब सुकेल त्याला चुरडू नको.. नि

माझ्यावर कध्धी तू…

 

तू लैला मी आहे मजनू

तुझ्यासाठी सांग काय आणू

तुला आणू का नक्षत्र तारे

नको नक्षत्र फुलंच बरे

फुले घेण्याची प्रथा तू मोडू नको नि

माझ्यावर कध्धी तू रूसू नको…

 

माझ्याकडे पाहून एकदा तू हास जरा

मग सुखाने जाईन मी माझ्या घरा…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा