*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संजना जुवाटकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
अनलज्वाला
*पुन्हा एकदा….*
झाले गेले जावे विसरत पुन्हा एकदा
दिन सोन्याचा येईल हसत पुन्हा एकदा
सुकून गेली फुले कालची तबकामधली
येतील फुले सडा शिंपडत पुन्हा एकदा
डोंबाऱ्याची दोरी तुटली झाली फसगत
जगण्यासाठी करतो कसरत पुन्हा एकदा
अजून काही नाही भिक्षा मनासारखी
उभा ठाकतो ओंजळ पसरत पुन्हा एकदा
हुंड्यासाठी जातोय बळी विवाहितेचा
माणूसपणा गेला हरवत पुन्हा एकदा
तुझ्या नि माझ्या ऋतुंतला चल ऋतू आठवू
प्रेम ऋतूने गाऊ लहरत पुन्हा एकदा
जगता जगता शिकून घेते बरेच काही
मरणानेही राहीन स्मरत पुन्हा एकदा
सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.
