You are currently viewing आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस लढणारच – सत्यजित तांबे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस लढणारच – सत्यजित तांबे

जास्तीत-जास्त युवक-युवतींना प्राधान्य देण्यासाठी करणार प्रयत्न…

सावंतवाडी

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला लढायच्या आहेत.त्यामुळे महाविकास आघाडी असली,तरी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने कामाला लागा.या निवडणुकीत निश्चितच युवक-युवतींना प्राधान्य दिले जाईल,आवश्यक असल्यास साम-दाम-दंड-भेद सर्व तत्वे वापरली जातील, त्यामुळे पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करा,असे आवाहन आज येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.दरम्यान गांधीगिरी हा काँग्रेसचा बाणा असला तरी पक्षात भगतसिंग सुद्धा जन्माला आले पाहिजे.कारण केंद्रात पैलवानांचे सरकार आहे.त्याला विरोध करायला आपल्या पक्षात सुध्दा पैलवान असले पाहिजे,असे ते यावेळी म्हणाले.तर स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षात युवक-युवतींना प्राधान्य दिले जाणार आहे.त्यादृष्टीने तसे उमेदवार तयार करण्यासाठी आमची चाचपणी सुरू आहे.मात्र युवकांनी सुद्धा पुढे येऊन भविष्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =