You are currently viewing कणकवली गोपुरी व नेत्र रुग्णालय भटवाडी नॅप संस्था सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला दिव्यांग बांधवांचा उस्फूर्त प्रतिसाद

कणकवली गोपुरी व नेत्र रुग्णालय भटवाडी नॅप संस्था सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला दिव्यांग बांधवांचा उस्फूर्त प्रतिसाद

*कणकवली गोपुरी व नेत्र रुग्णालय भटवाडी नॅप संस्था सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला दिव्यांग बांधवांचा उस्फूर्त प्रतिसाद*

सावंतवाडी

आयोजित डॉ. रेड्डीज फाउंडेशन मुंबई, व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल,रोटरी क्लब कणकवली व एकता दिव्यांग विकास संस्था कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला दिव्यांग बांधवांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यामध्ये ॲड. रावराणे रोटरी क्लब कणकवली अध्यक्ष, गागणं मॅडम,अनिल कर्पे, दीपक बेलवलकर, व आदी रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच एकता दिव्यांग विकास संस्था अध्यक्ष सुनील सावंत, डॉ. रेड्डीज फाउंडेशनचे अधिकारी गौतम काळे सर, नामदेव शिंदे, संगीता पाटील ग्रामसेवक अधिकारी, साईकृपा संस्थचे अध्यक्ष अनिल शिंगाडे सर,सुनील तांबे सर, श्यामसुंदर लोट सर, सचिन साधये सर,बाळू मेस्त्री सर, साईकृपा संस्था कर्मचारी विशाखा कासले, संजना गावडे, हर्षल खरात, आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या मेळाव्यामध्ये ४० हून जास्त दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला होता. यामध्ये दिव्यांग बांधवांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन सिलेक्शन होणार आहे. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. रावराणे सर यांनी सांगितले की, दिव्यांग व रोटरी क्लब यांचे नाते जोडलेले असून त्यांना वेळोवेळी योग्य ती मदत करू तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्या व अशा संस्थांशी जोडले जावे असे उदगार व्यक्त केले. गांगण मॅडम यांनीही उपस्थितीत दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या.साईकृपा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर यांनी रोजगार मेळाव्याचे मार्गदर्शन केले. व रेड्डीज फाउंडेशनचे अधिकारी गौतम काळे सर यांनी नोकरी संदर्भात मार्गदर्शन केले.उपस्थित दिव्यांग बांधवांना रोटरी क्लबच्या माध्यमातून उपहाराची व्यवस्था करण्यात आली.
तसेच २६ जुलै रोजी नॅप संस्था सावंतवाडी रोजगार मेळावा संपन्न झाला. हेलन किलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या मेळाव्याला नॅप सचिव सोमनाथ सर, रेड्डीज फाउंडेशनचे हेड सुमित सर, गौतम काळे सर, बाळा बोर्डे सर, शिंदे सर, प्रसाद सर, साईकृपा संस्था अध्यक्ष व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गचे जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सर, सुनील तांबे सर, विशाखा कासले मॅडम, हर्षल खरात आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. रेड्डीज फाउंडेशनचे हेड सुमित सर यांनी रेड्डीज फाउंडेशनबद्दल दिव्यांग बांधवांना माहिती दिली व मार्गदर्शन केले. बाळा बोर्डे यांनीही दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच नॅप संस्था सचिव सोमनाथ सर यांनी नॅप संस्थाबद्दल माहिती दिली. व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या. रेड्डीज फाउंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. साईकृपा संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांना उपहाराची व्यवस्था करण्यात आली. सुनील तांबे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले

प्रतिक्रिया व्यक्त करा