You are currently viewing बांद्यात स्थावर मालमत्ता नोंदणीसाठी सीटी सर्वेक्षण…

बांद्यात स्थावर मालमत्ता नोंदणीसाठी सीटी सर्वेक्षण…

जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचा पुढाकार

सावंतवाडी

बांदा शहरातील मालकी हक्काच्या स्थावर मालमत्तेच्या नोंदणीसाठी शहरात जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने सिटी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक डॉ. विजय वीर यांनी  बांदा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अक्रम खान यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड संदर्भात माहिती मिळावी यासाठी मंगळवार दिनांक १६ रोजी सकाळी साडेदहा वाजता शहरातील नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बांदा शहरात यापूर्वी १९८८ साली सिटी सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र यासंदर्भात अद्ययावत माहिती अपडेट करण्यात आली नव्हती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात भूमी अभिलेख कडून सिटी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता उतारा) ऑनलाईन देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मालमत्तेचा पुरावा म्हणून जमीन व बांधकाम केलेले घर यांचा मालमत्ता उताऱ्यात समावेश असणार आहे.

शासनाने दुहेरी मालकी हक्क बंदी आदेश दिल्याने भविष्यात सातबारा व असेसमेंट (घरपत्रक उतारा) ग्राह्य धरला जाणार नाही. यासाठी प्रॉपर्टी कार्ड महत्वाचा पुरावा ठरणार आहे. यामुळे सिटी सर्वेक्षण करून नागरिकांनी प्रॉपर्टी कार्ड उतारा घ्यावा असे आवाहन डॉ. वीर यांनी केले. यावेळी सरपंच अक्रम खान व ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर यांनी ग्रामपंचायत प्रशासन पुर्णपणे सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक प्रियदा साकारे, निमतानदार भालचंद्र सावंत, भूकरमापक रवींद्र चव्हाण, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामविस्तार अधिकार डी. एस. अमृतसागर आदी उपस्थित होते. १६ रोजी ग्रामपंचायत सभागृहात होणाऱ्या बैठकीसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून शंका निरसन करावे असे आवाहन सरपंच खान व डॉ. विर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 9 =