You are currently viewing “फोंडाघाटमधील खड्ड्यांवर संवाद मिडियाचा ठोस प्रभाव; अजित नाडकर्णींच्या पाठपुराव्याला यश”

“फोंडाघाटमधील खड्ड्यांवर संवाद मिडियाचा ठोस प्रभाव; अजित नाडकर्णींच्या पाठपुराव्याला यश”

“फोंडाघाटमधील खड्ड्यांवर संवाद मिडियाचा ठोस प्रभाव; अजित नाडकर्णींच्या पाठपुराव्याला यश”

फोंडाघाट

फोंडाघाट परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची गंभीर समस्या अखेर मार्गी लागली असून संवाद मिडीया आणि अजित नाडकर्णी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून संवाद मिडीयाच्या माध्यमातून या प्रश्नाची जोरदार दखल घेतली जात होती. याचा परिणाम म्हणून केवळ मुख्य रस्तेच नव्हे, तर जे स्थानिकांनी कंत्राटदाराच्या बाजूने भूमिका घेतल्या होत्या, त्यांच्या दारातील खड्डेही बुजवण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही यावर लक्ष देऊन आपल्या यंत्रणेतून थडो (खड्डे) बुजवले असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या कामासाठी फोंडाघाट परिसरातील अनेक नागरिकांनी फोन करून संवाद मिडीयाचे प्रतिनिधी अजित नाडकर्णी यांचे आभार मानले.

संवाद मिडीयाच्या सातत्याने आवाज उठवणाऱ्या भूमिकेमुळेच प्रशासन हालले आणि फोंडाघाटच्या रस्त्यांना दिलासा मिळाला आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा