सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदी उमाकांत वारंग…
कणकवली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी उमाकांत वारंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही नियुक्ती केली आहे. याबाबतचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी श्री. वारंग यांना प्रदान केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत व वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य करा, असा विश्वास नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. श्री. नाईक यांनी श्री. वारंग यांचे निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, राज्यचिटणीस सुरेश गवस, राज्यचिटणीस एम. के. गावडे, जिल्हा महिलाध्यक्षा प्रज्ञा परब, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, वेंगुर्ल्ये तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव राणे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, संदीप राणे, जिल्हा युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष उमाकांत वारंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अस्लम महासचिव शफिक खान, अपंगाचे जिल्हाध्यक्ष सामाजी सावंत, कामगार सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, जिल्हा महिला उपाध्यक्ष मानसी देसाई, दोडामार्ग महिला अध्यक्ष धनश्री देसाई, उपाध्यक्ष विराज बांदेकर, इमरान शेख, शहराध्यक्ष गोमेश चौगुले, केदार खोत, सावंतवाडी तालुका महिला अध्यक्ष रितिक परब, संतोष राऊत, वेंगुर्ला चिटणीस विलास पावसकर आदी उपस्थित होते.
