पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 22 जुलै रोजी आयोजन
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग व कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दि. 22 जुलै रोजी कणकवली कॉलेज कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त येरमे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त करुन देण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील नामांकित उद्योजक, इंडस्ट्रिजना या रोजगार मेळाव्यात आमंत्रित करण्यात आले आहे. उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये आपली रिक्तपेद अधिसूचित करावीत. जिल्ह्यातील नोकरी साधक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज करावे. तसेच 22 जुलै 2025 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा कणकवली कॉलेज कणकवली येथे शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी 02362 228835, मोबा. 9403350689 किंवा ईमेल आयडी,sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधवा.
