You are currently viewing उद्या २३ जुलै रोजी कणकवली नगरपंचायत अग्निशमन बंबाचे लोकार्पण

उद्या २३ जुलै रोजी कणकवली नगरपंचायत अग्निशमन बंबाचे लोकार्पण

आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार लोकार्पण

कणकवली :

 

कणकवली नगरपंचायतीला अत्याधुनिक सोई सुविधांयुक्त अग्निशमन बंब प्राप्त झाल्याचे काही दिवसांपूर्वी देण्यात आले होते. काही कारणास्तव या बंबाचे लोकार्पण पुढे ढकलण्यात होते. उद्या रविवारी २३ जुलै रोजी सकाळी ११ :३० वाजता अग्निशमन बंबाचे आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते कणकवली नगरपंचायत येथे लोकार्पण करण्यात येणार असून अग्निशमन बंब जनतेच्या सेवेत कार्यान्वित करण्यात येणार आहे. कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याबाबत माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा