You are currently viewing का ?…

का ?…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*का ?…*

 

कोंडून ठेवतात लोक दु:ख हे उरी

दाखवती जगणे जगी तरीही भरजरी

 

लपविण्याचा रोग का हा जपती अंतरी

मातीच्याच चुली असती घरोघरी…

 

मुलामा वर्ख फार नाही चालत

लक्तरे ही उडती पहा दिसली ना जरी..

 

चिंध्या ह्या घेऊन उरी ऊर फाटतो

का न होती व्यक्त लोक फुटती अंतरी..

 

जीवघेणी कळ अशी करते नाश हो

पांघरू नकाच असे दु:ख भरजरी..

 

मातीतच ठेवा पाय माथा खांद्यावरी

वावटळ येते पहा गरगर भोवरी…

 

जे आहे जे जितके दिले देवाने

समाधान का न मिळे हाव ना बरी…

 

दु:ख का हो मोलाने घ्यावे माणसा

लालसा नव्हेच बरी फुटते अंतरी…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा