*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*लहरी पाऊस*
अरे पावसा
असा कसा तुझा
लहरी स्वभाव
त्याचा पडतो आमच्यावर
प्रभाव
तू कधी कुणाचे
ऐकले आहे का
हवामान खात्याचा
अंदाज चुकवण्यात
तू नेहमी यशस्वी ठरतो
जेंव्हा हवा असतो
तेंव्हा येत नाही
नको त्या वेळी भरपूर येतो
जिथे पाहिजे तिथे येत नाही
नको तिथे सारखा पडतो
ये म्हटलं तर येत नाही
आणि
जा म्हटलं तर जात नाही
मृगात वाट पहायला लावतो
श्रावणात ऊन सावलीचा
खेळ खेळतो
कधी कधी लपून बसतो
कधी कधी
वाऱ्याच्या वेगाने धावतो
कुठे दुष्काळ
तर कुठे महापूर
वादळ आणतो
पावसा,
किती आणि कसा रे
तुझा हा लहरी पणा
करू नको प्रवास
असा जीवघेणा
पावसा
सोड तुझा लहरी पणा
वेळेवर ये
वर्षाऋतूचा आनंद घे
ह्या सजीव सृष्टीला
जीवनदान दे
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.

