You are currently viewing सिंधुदुर्गनगरी येथे 15 रोजी महिला मेळावा

सिंधुदुर्गनगरी येथे 15 रोजी महिला मेळावा

सिंधुदुर्गनगरी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त राज्यभर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहाअंतर्गत समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शुक्रवार दि. 15 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला मेळाव्यास जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =