You are currently viewing *सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने लवकरात पूर्ण करण्याचे न्यायालयाचे आदेश* 

*सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने लवकरात पूर्ण करण्याचे न्यायालयाचे आदेश* 

*सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने लवकरात पूर्ण करण्याचे न्यायालयाचे आदेश*

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने लवकरात लवकर पूर्ण करावा असे आदेश न्यायालयाने द्यावेत अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती न्यायालयाने रद्द केली आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास किती कालावधीत लावावा यासाठी सीबीआयला कोणतेही निर्देश देऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास मर्यादित काळात पूर्ण करण्यात यावा, त्याच्या तपासाचा अहवाल मागून घ्यावा यासाठी सीबीआयला निर्देश द्यावेत अशा आशयाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ती रद्द केली आहे.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू हा गेल्या वर्षी जूनमध्ये झाला होता. हा तपास सध्या सीबीआयच्या हातात आहे. त्यावर सीबीआयने या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करावा आणि निष्कर्ष काढावा, तसे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. सुशांतचे लाखो चाहते आहेत ज्यांना या प्रकरणाचा तपास लवकर व्हावा असे वाटते असेही या याचिकेत म्हटलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा