You are currently viewing वैभववाडी पोलिसांच्या  कारवाईत कुसुर येथे ५ लाखाची गोवा बनावटीची दारु जप्त

वैभववाडी पोलिसांच्या  कारवाईत कुसुर येथे ५ लाखाची गोवा बनावटीची दारु जप्त

वैभववाडी पोलिसांच्या  कारवाईत कुसुर येथे ५ लाखाची गोवा बनावटीची दारु जप्त

वैभववाडी
महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पोतून गोवा बनावटीची बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अय्याज शहा आलम पठाण वय ३३ रा. घानेगाव ता. बार्शी, जि. सोलापूर व सोमनाथ भीमराव कसबे वय 37 रा. रामहिंगणी ता. मोहळ जि सोलापूर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ लाख ४ हजार रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू व सुमारे ८ लाख रुपये किमतीचा महेंद्र बेलोरो पिकअप टेम्पो जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री १०. १० वाजण्याच्या सुमारास कुसुर पिंपळवाडी फाटा येथे करण्यात आली.

वैभववाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन पाटील, पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस कॉन्स्टेबल अजय बिल्पे, हरीश जायभाय किरण मेथे, महिला पोलीस योगिता जाधव, सूर्यकांत माने, रघुनाथ जांभळे यांचे पथकाने कुसुर पिंपळवाडी फाटा येथे शनिवारी रात्री नाकाबंदी केली होती. यादरम्यान वैभववाडी नापणे मार्गे आलेल्या महिंद्रा पिकप टेम्पोला पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले. चालक व त्याच्यासोबत असलेला इसमाकडे पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी महिंद्रा पिकप टेम्पोच्या हौद्यात पाहणी केली असता कोंड्याच्या पोत्याच्या आत मध्ये गोवा बनावटीच्या दारूंचे बॉक्स दिसून आले.

घटनास्थळी स्थानिक पंचांना बोलवून वस्तुस्थितीचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर सदर टेम्पो वैभववाडी पोलीस ठाणेत आणण्यात आला. या ठिकाणी गोवा बनावटीच्या दारूच्या बॉक्समधील दारूच्या बाटल्या त्यांची मोजतात केली असता सुमारे ५ लाख ४ हजार रुपये किंमतीची दारू पोलिसांनी जप्त केली. तसेच दारू वाहतूक करणारा महिंद्रा पिकअप टेम्पो अंदाजे किंमत सुमारे आठ लाख रुपये असा एकूण १३ लाख, ४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा