You are currently viewing बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूलची कारवाई

बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूलची कारवाई

मालवण

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यां एका डंपरवर महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी आचरातीठा येथे कारवाई केली. कारवाईत जप्त केलेला सदर डंपर आचरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. मंडल अधिकारी आचरा यांचे भरारी पथक फिरत असताना देवगडच्या दिशेने जाणारा डंपर आचरा तिठा येथे विनापास वाळूवाहतुक करताना आढळुन आला असता ही कारवाई करण्यात आली. आठवड्या भरात सहा डपंरवर महसूल विभाग कडून कारवाई करण्यात आल्याचे महसूल कडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा