You are currently viewing कासार्डे विद्यालयाची वैदेही राणे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

कासार्डे विद्यालयाची वैदेही राणे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

विद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले

 

कणकवली / तळेरे (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, मार्फत सन- 2022- 23 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाची कु. वैदेही राणे हिने 210 गुणासह राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण विभातून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर याच विद्यालयाचे अजून तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पुर्व माध्यमिक राष्ट्रीय सर्वसाधारण ग्रामीण विभागात

कु.वैदेही मधुसूदन राणे २१० गुण जिल्हात १ली

कु.वेदिका दीपक तेली 192 गुणांसह 19 वी,

कु.ईशा अविनाश धुमाळे १८२ गुणांसह २९ वी व हर्ष संदीप ब्रम्हदंडे १८२ गुणांसह ३०वा आला आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिष्यवृत्ती विभागप्रमुख सौ.सविता जाधव तसेच विभागातील मार्गदर्शक शिक्षक अनंत कानेकर,सौ.विधी मुद्राळे,श्री.यशवंत परब आदी शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

या गुणवंत विद्यार्थ्यांचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, पालक शिक्षक संघाचे उपाअध्यक्ष श्री.संतोष सावंत, प्र.मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर, प्र.पर्यवेक्षिका सौ.बी.बी.बिसुरे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच याप्रसंगी इ.६ वी तील विद्यार्थी कु. अजहर जाकीर शेख यानेही पुर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत जिल्ह्यात ६७ वा क्रमांक पटकावून शिष्यवृत्ती मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले. या गुणगौरव सोहळाला इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सेक्रेटरी रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, चेअरमन अरविंद कुडतरकर यांच्यासह सर्व संस्था पदाधिकारी तसेच प्राचार्य एम.डी.खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंदानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा