सौ . प्रिया पराग चव्हाण आत्महत्या प्रकरण….
माजी नगराध्यक्षा प्रणाली मानेंसह मुलाला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
सिंधुदुर्ग
सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील सौ . प्रिया पराग चव्हाण (३३) हिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने आणि त्यांचा मुलगा आर्य माने या दोन्ही संशयितांना जिल्हा न्यायाधीश 2 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.
