You are currently viewing मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर सिंधुदुर्गातील आपल्या मूळ गावी..

मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर सिंधुदुर्गातील आपल्या मूळ गावी..

सिंधुदूर्ग :

मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष सौ. पूजा महाडेश्वर आज सिंधुदुर्गात आपल्या पोखरण- कुसबे या मूळ गावी दाखल झाल्या.

कुसबे येथील श्री देवी भगवती देवीच्या गोंधळ उत्सवास आलेल्या माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना प्रणित ग्राम विकास पॅनल ने आपले वर्चस्व राखल्याने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा आज सत्कार समारंभ विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 5 =