यावर्षी आय ए एस झालेले मान्यवर मार्गदर्शक
अमरावती :
ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेचे योग्य व अचूक ज्ञान प्राप्त व्हावे या दृष्टिकोनातून अमरावती जिल्ह्यातील परतवाडा रोडवरील वलगाव या गावातील प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य अशा सिकची रिसॉर्टमध्ये एका स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा येत्या बुधवार दिनांक ९ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली आहे.
अमरावतीचे सुपुत्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांच्या मातोश्री प्राचार्य डॉक्टर कमलताई गवई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला यावर्षी आय ए एस. झालेले धारणी तालुक्यातील हरीसाल येथील डॉ. शिवांग तिवारी धामणगाव रेल्वे येथील श्री रजत पत्रे व वरुड च्या कु.नम्रता ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात येणार असून ते स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिकची ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रेमकिशोर सिकची मिशन आय.ए.एस.चे संचालक व सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे व राजपत्रित अधिकारी डॉ.सुशांत गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टने नेहमीच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी युवकांसाठी ग्रामीण भागातील लोकांसाठी सातत्याने अभिनव उपक्रम राबविले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रशासनात जावे व स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत व्यापक जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून येत्या नऊ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता वलगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अशा प्रकारचा भव्य असा या भागातील हा पहिलाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला परिसरातील लोकांनी तसेच विद्यार्थ्यांनी पालकांनी व शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती या ट्रस्टचे संचालक श्री सचिन मालकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकादवारे केली आहे.
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003

