You are currently viewing सावंतवाडी- न्यू खासकिलवाडा येथे १९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम…

सावंतवाडी- न्यू खासकिलवाडा येथे १९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम…

सावंतवाडी

न्यू-खासकिलवाडा येथील शिवधर्म प्रतिष्ठान व शिवप्रसाद क्रीडा मंडळ यांच्यावतीने शिवजयंती निमित्त १९ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी शिवप्रतिमेस अभिषेक व पूजन, शिवजय घोष, तर सायंकाळी पैठणीचा कार्यक्रम, तसेच स्वागत व सत्कार, आणि रात्री विश्वकर्मा दशावतार नाट्य मंडळ-नेरुर यांचा “गरुड परिहार” हा ट्रिक्सिन नाट्य प्रयोग सादर होणार आहे. याच कार्यक्रमात बालरोगतज्ञ दत्ता सावंत यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तरी दिवसभरात होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांसाठी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवधर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पांचाळ व शिवप्रसाद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ गावडे यांनी केले आहे.

न्यू-खासकिलवाडा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी चौकातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करून पूजन केले जाणार आहे. त्यानंतर शिवजय घोष, व संध्याकाळच्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तसेच मान्यवरांचे स्वागत व सत्कारही या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाणार आहेत. तरी याप्रसंगी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. पांचाळ व श्री. गावडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा