You are currently viewing सिंधुदुर्ग विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा, मुंबई हवाई सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील

सिंधुदुर्ग विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा, मुंबई हवाई सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील

सिंधुदुर्ग विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा, मुंबई हवाई सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील

मालवण :

केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे घेतलेल्या जनता दरबारात भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने त्यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग (चिपी) एअरपोर्टवर नाईट लँडिंग सुविधा होण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई विमानसेवा सुरु करावी यासाठी ना. मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र व राज्य सरकारने पर्यटन जिल्हा घोषित केला असून दरवर्षी १५ लाखापेक्षा जास्त पर्यटक पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट देत असतात. पर्यटनासाठी हवाई वाहतुकीला पर्यटक पसंती देत असून मुंबई हे ठिकाण देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी केंद्रबिंदू असून सिंधुदुर्ग (चिपी) एअरपोर्ट ते मुंबई ये जा विमानसेवा सुरु करावी तसेच लाईट लँडिंग उपलब्ध केल्यास विमानसेवेत वाढ होईल. तसेच पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्ग विमानतळच्या कनेक्टिव्हिटीच्या माहितीसाठी पर्यटन मंत्रालय केंद्र सरकार कडून स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती, प्रसिद्धी साठी पाठपुरावा करावा तसेच आवश्यतेनुसार गोवा विमानतळावर शटल सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली.

यावर बोलताना ना. मुरलीधर मोहोळ यांनी मुंबई विमानसेवा सुरु करणे, सिंधुदुर्ग विमानतळावर लाईट लँडिंग सेवेसाठी सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही दिल्याची माहिती विष्णू मोंडकर यांनी दिली. यावेळी भाजप महिला शहर अध्यक्षा अन्वेषा आचरेकर, शहर चिटणीस महिमा मयेकर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा