खून करून पुरावे नष्ट करण्याच्या आरोपातून संशयिताची जामिनावर मुक्तता
कणकवली
उत्तम काशिराम सरकार यास लोखंडी शिगेने मारहाण करून जिवे मारले तसेच रूममधील रक्ताचे डाग साफसफाई करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी भिम उर्फ कुट्टू धर्मादास मुजुमदार (पश्चिम बंगाल) सध्या राहणार कुडाळ-कुंभारवाडी याची जिल्हा न्यायालयाने ५०,०००/-रू. यावर जामिनावर तसेच काही अटी शर्थीवर जामिनावर मुक्तात केली आहे.
आरोपीच्यावतीने ॲड. अशपाक शेख यांनी काम पाहिले.
रानबांबुळी सिमरेवाडी(ता.कुडाळ) येथील बापूजी यशवंत तोरसकर यांच्या मालकीच्या चाळीतील भाडेकरी उत्तम सरकार याचा मजुरीच्या पैशाच्या कारणावरून आरोपी भिम उर्फ कुट्टू धर्मादास मुजूमदार याने लोखंडी शिगेने मारहाण करून ठार मारले अशी फिर्याद रविंद्र रामचंद्र पाटील यांनी सिंधुनगरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती.
फिर्यादि यांच्या फिर्यादिनुसार दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी उत्तम काशिराम सरकार यांचे डोकीवर व तोंडावर लोखंडी सळीने जबर मारहाण केली होती. उपचार सुरू असताना उत्तम सरकार हा मयत झाला होता. आरोपी भिम मुजुमदार याने त्या रूममधील रक्ताचे डाग साफसफाई करून पुरावा नष्ट केला होता. अशा आशयाची फिर्याद दिलेली होती.
तपासिक अंमलदार यांनी १ जानेवारी २०२५ रोजी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली होती. दोषारोप पत्र दाखल झाल्यावर आरोपीच्या वकीलानी जामिन अर्ज दिला होता. सदरचा जामिन अर्ज ओरोस येथील जिल्हा सत्र न्यायालयात न्यायमुर्ती पी.बी.गायकवाड यांनी आरोपीची ५०,०००/-रूपयाच्या जामिनावर तसेच काही अटी शर्थीवर जामिनावर मुक्तता केली आहे.