श्री.देव राधाकृष्ण मंदीरात आज जलाभिषेक संपन्न
फोंडाघाट
आज फोंडाघाट वैश्य समाज श्री.देव राधाकृष्ण मंदीरात मथुरेला जाऊन आलेले ३० जण यांनी मंदीरात जलाभिषेक केला. सकाळी ८ ते १० वाजेयर्यंत जलाभिषेक झालेवर सर्वांनी पुजा केली. सर्व जण सपत्नीक पुजेला बसले.त्यानंतर १२ वाजता १२ आरत्या झाल्या. नंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आरती झालेवर श्री.राधे राधे म्हणत पुर्ण परीसर दुमदुमुन गेला.पवीत्र मंदिरात श्री.राधाकृष्ण श्री,गणपती यांच्या मुर्ती पाहुन भान हरपुन जात होते.अजित नाडकर्णी यांनी प्रसाद म्हणुन श्री.राधाकृष्णाला लाडु अर्पण केले.असे कार्यक्रम कायम होत राहोत म्हणुन श्री.बंडु करंबेळकर आणि श्री.कामतेकर यांनी गाराणे केले. सर्वांनी सुग्रास भोजनाचा लाभ घेतला.श्री.राधे राधे नर्मदेचे पाणि आणले होते.त्याचा जलाभिषेक घातला गेला.बाळगोपाळ मंडकाचे अजित नाडकर्णी यांनी स्वागत केले.*
*अजित नाडकर्णी.संवाद मिडीया.*