You are currently viewing थोडा वेळ आहे का?

थोडा वेळ आहे का?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*थोडा वेळ आहे का?*

 

थोडा वेळ आहे का

एखाद्या वळणावर विसावा घ्यायला?

समोरचा काय म्हणतोय ते ऐकायला?

 

थोडा वेळ आहे का

दुसऱ्यासाठी काढायला?

एकमेकांशी संवाद साधायला?.

 

थोडा वेळ आहे का?

स्वत:ला आधी ओळखायला

आपलंच मन‌ जाणायला?

 

थोडा वेळ आहे का

शरीराचा आवाज ऐकायला?

रोगांना दूर सारायला

 

सगळेच जिथे होत चालले आहेत

अळूच्या पानासारखे निर्लेप…

 

थोडा वेळ आहे का

कुणाशी तरी बोलायला

प्रश्नाची अवघड सा-या

उत्तरे ही शोधायला

 

*©️®️ डॉ सौ मानसी पाटील*

प्रतिक्रिया व्यक्त करा