सावंतवाडी :
सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याने मंगळवारी सायंकाळी सावंतवाडी भाजपा मध्यवर्ती कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला.
यावेळी “चव्हाण साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..!, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो..”अशा घोषणा देत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोकणचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने कोकणात भाजप आणखीन बळकट होईल, असा विश्वास सावंतवाडी खरेदी विक्री संघ चेअरमन प्रमोद गावडे यांनी व्यक्त केला. तर माजी तालुकाध्यक्ष रवींद्र मडगावकर म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सव होत असून सावंतवाडी तालुक्यातील भाजपाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, माजी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल सरचिटणीस प्रमोद गावडे, बांदा मंडल सरचिटणीस मधुकर देसाई, आंबोली मंडळ सरचिटणीस संजय शिरसाट, ॲड. संजू शिरोडकर, गुरुनाथ मठकर, अमित गवंडळकर, नागेश जगताप, महेश बांदेकर, राजन राणे, गणेश प्रसाद पेडणेकर, सुकन्या टोपले, मिसबा शेख, ज्योती मुद्राळे, मेघना सागावकर, अलिशा मेस्त्री, श्रुती सावंत, मेगा भोगटे, योगेश गवळी, दत्ताराम कोळेकर, ज्ञानदीप राऊत, उल्हास परब, ओंकार आजगावकर, कुणाल शृंगारे, संदेश सावंत, निलेश पास्ते, बाळकृष्ण सावंत, अंकित धावुस्कर, दिना कशाळीकर, प्रवीण देसाई आदी उपस्थित होते.