ठाणे :
रविवार दिनांक २९ जून रोजी दुपारी १२ वाजता व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचा ठाणे शहर कमिटी आणि तालुका कमिटी पदनियुक्तीचा कार्यक्रम ठाणे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाला. यात अनेक युट्युब न्यूज चॅनलच्या पत्रकारांनी आपली हजेरी लावली. अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मिडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.मंगल डोंगरे साहेब, ठाणे जिल्हा महासचिव शरद घुडे, पालघर जिल्हा अध्यक्ष रंगनाथ तांगडी ठाणे जिल्हा प्रवक्ते श्री संतोष चव्हाण ठाणे जिल्हा साप्ताहिक विंग चे अध्यक्ष अशोक पाटोळे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा वनिता त्र्यंबके, तालुका अध्यक्ष कृष्णकांत फुलोरे, ठाणे शहर अध्यक्ष श्री. भुजंगराव सोनकांबळे हे मान्यवर पत्रकार उपस्थित होते. व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघाच्या सदस्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यात 1) ठाणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण वन्नम 2) ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष खरात 3) ठाणे शहर सचिव सुनील विश्वकर्मा 4) ठाणे शहर कार्याध्यक्ष नेहा गायकवाड 5) ठाणे शहर उपकार्याध्यक्ष जया मिश्रा 6) ठाणे शहर संघटक प्रकाश कदम 7) ठाणे शहर संघटक अजय मगरे 8) ठाणे शहर संघटक राजेश चौघुले 9) ठाणे शहर सदस्य मयुरी वन्नम 10) ठाणे शहर सदस्य रंजना कदम 11) ठाणे शहर सदस्य आलोक सिंग.. इत्यादी पदाधिकारी यांची निवड करून त्यांचा सत्कार करून नियुक्ती पत्र देण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
