*कोकण मराठी साहित्य परिषद डहाणूचे सदस्य कवी सुहास काशिनाथ राऊत वरोरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“अनुपमा !”*
दिव्य व्यक्तीत्व ठासुन भरले अंगी अनुपमेय,
बहुगुणी विलक्षण विदुषी गुरुवर्या ती श्रध्देय!
अवतरली गुरुवर्या घरी होऊनी शारदेचा अंश,
जुन २७ सुदिन ठरला बहरण्यास तो वंश!
कोळगांव नामे ग्रामिण गांव जन्म जाहला तिथे,
खानदेशी तो परीसर सगळा बहिणाबाई जन्मली जेथे!
मातीचा तो गुण घेऊनी विभुती जन्मा आली,
प्रज्ञा तेज दिसुन आले चालता बालीकेच्या पाऊली!
बहाळ नामे ग्राम दुजे जिथे, पेन्सील पाटी घेतली हाती!
प्राथमिक माध्यमिक शिक्षणासाठी तिच होती तिची काशी!
चाळीसगांव मग शहर गांठले, महाविद्यालयीन शिक्षण जेथे!
मराठी हिॅदीत एम.ए.करुनी बी.एड ही झाली तेथे!
जानेवारी २६चा सुदिन तो चालली पावले सात,
रामेश्वर जाधवांना भेटली, बांधली जन्मगांठ!
दोन अपत्यांसह माऊली डहाणुग्रामी वसली,
राहता दुर जन्मभुमी डहाणु कर्मभूमी जाहली!
नयनरम्य ती नगरी डहाणु शिक्षणाचेही केंद्र,
के.एल.पोंदा हायस्कुल समीप निळाशार समुद्र!
उभयतांनी रुजुवात आपुल्या नोकरीची तेथे केली,
तन मन धन अर्पुन सकल शाळा अपुली केली!
कुशाग्र बुध्दी नवोन्मेशाचे पाझरत होते झरे,
लिहीली ओळ काव्य जाहली लेखणी सतत फुरफुरे!
कथा लेख कविता सार्या बंदिस्त पुस्तकी झाल्या,
किती कहाण्या गीत मुलाखती नभोवाणीवरही आल्या!
रोज एक कविता लिहुनी विक्रम आगळा केला,
प्रशस्तीपत्रे स्मृतीचिन्हांचा घरात भरला मेळा!
सहस्र जमली प्रमाणपत्रे शतक गाठती स्मृतीचिन्हे,
शेकडो कविता अजुनी अव्यक्त
अवतरतील अशी सुचिन्हे!
काय देऊ उपमा तिजला उपमानच आहे ती!
विस्तार भयास्तव लिहिले थोडके
बाकी लिहीणे शिल्लक अती!
*कवी:—*
*सुहास काशिनाथ राऊत/वरोरकर*
*डहाणूरोड पूर्व*
*९९२३००४८९५*
*८७८८९१९७८३*